पुणे ः महायुतीमध्ये सहभागी असलेले पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स
पुणे ः महायुतीमध्ये सहभागी असलेले पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी भाजपचा अजित पवारांना असलेला विरोध वाढतांना दिसून येत आहे. रविवारी पुण्यात महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून, अजित पवार यांच्या जन्मसमान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.
अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होतांना दिसून येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीचे खापर अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे झाल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नोंदवले होते. त्यानंतर अजित पवारांविषयीची नाराजी वाढतांना दिसून येत आहे. त्यातच अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत भाजपच्या पदाधिकार्यांनी काळे झेंडे दाखवले. माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केले. पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावल जात असल्याचा आरोप करत त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा जुन्नर तालुक्यात पोहोचली असता महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आला. नारायणगाव येथे जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले. शासकीय कार्यक्रम घेऊनही घटकपक्षांना डावलले जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचके यांनी केला. पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना होणारा विरोध तीव्र आहे. काही महिन्यांपूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील अजित पवार पुणे शहर आणि जिल्ह्यावर वर्चस्व राखतांना भाजप कार्यकर्त्यांना दुय्यमत्वाची वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. मात्र नंतरच्या काळात चंद्रकांतदादांचा सूर मवाळ झाला होता, मात्र कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा – पालकमंत्र्यांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. मी फक्त राष्ट्रवादीचा पालकमंत्री असून महायुतीशी माझा संबंध नाही असे अजित पवारांनी जाहीर करावी अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. अजित पवार पालकत्वाची भूमिका पाळत नाहीत, असा आरोपही भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळाबाहेर रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहतुकीचाही बोजवारा उडाला. अजित पवार चोरून चोरून बैठका घेतात. प्रशासनाचा गैरवापर करतात.
शिंदे गटाचा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर बहिष्कार – अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी झालेल्या आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे गटाने बहिष्कार टाकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या जन सन्मान यात्रेत ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचे नाव बदलून ’माझी लाडकी बहीण’ असे नामकरण करून प्रचार व प्रसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात येत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
COMMENTS