पुणे ः वानवडी भागात महंमदवाडी रस्त्यावरील वाडकरमळा परिसरातील मॅजेस्टिक मेमरीज सोसायटी येथे तळमजल्यावरील बी. जी. एस. ज्वेलर्स येथे भरदिवसा दरोडा ट
पुणे ः वानवडी भागात महंमदवाडी रस्त्यावरील वाडकरमळा परिसरातील मॅजेस्टिक मेमरीज सोसायटी येथे तळमजल्यावरील बी. जी. एस. ज्वेलर्स येथे भरदिवसा दरोडा टाकणार्या व पोलिसांचा तपास भरकटविण्यासाठी काही ठरावीक अंतरावर जाऊन वेशांतर करणार्या गुन्हेगारांच्या सात जणांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अहमदनगरमधील भिंगार, रायगड आणि चाकण येथून जेरबंद केले. त्यांच्याकडून 601 ग्रॅम वजनाचे सोने, 2 दुचाकी, एक चारचाकी, 6 मोबाईल असा 48 लाख 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मयुर चुन्नीलाल पटेल ( वय 53, रा. वानवडी,पुणे), नासिर मेहमुद शेख, (वय 32, रा. वानवडी,पुणे), सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे ( वय 20, पौड रोड, कोथरुड, पुणे), सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे (वय 19 रा. कोथरूड,पुणे ) पियुष कल्पेश केदारी (वय 18 रा, येरवडा,पुणे), ओमकार ऊर्फ ओम्या जगन वाल्हेकर (वय 19, रा. कोथरुड,पुणे), नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी ( वय 20, रा. टिळेकर नगर, कात्रज,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत शफीउद्दीन शेख (वय 23, रा. नाना पेठ, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 18 मे रोजी तक्रारदार शेख हे ज्वेलर्स दुकानात बसले होते. त्यावेळी सोने खरेदीच्या बहाण्याने आरोपी चेहर्याला मास्क लावून दुकानात आले. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून मालकास मारहाण करून 600 ग्रॅम वजनाचे तयार दागिने घेऊन आरोपी फरार झाले. यानंतर तत्काळ गुन्हे शाखेने खंडणी विरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक, युनिट चार, पाच आणि सहा असे वेगवेगळी दहा पथके तयार करून आरोपीचा सर्वत्र शोध सुरू केला. सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक तपासावरून पोलिस कर्मचारी अशोक शेलार यांना महत्वपूर्ण माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पुण्यासह नगरमधील भिंगार, रायगडसह चाकण येथून ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर, खंडणी विरोधी पथक 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, पोलिस निरीक्षक उल्हास कदम, पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवदास लहाणे, वियजकुमार शिंदे, उपनिरीक्षक, श्रीकांत चव्हाण, यशवंत ओंबासे, अमंलदार मयुर भोकरे, चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
COMMENTS