अहमदनगर/प्रतिनिधी ः खर्डा(ता. जामखेड) येथे आडत व्यापार्यास रस्त्यात अडवून व हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारी तिघांची टोळी 7 लाख 10 हजार रुपयां
अहमदनगर/प्रतिनिधी ः खर्डा(ता. जामखेड) येथे आडत व्यापार्यास रस्त्यात अडवून व हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारी तिघांची टोळी 7 लाख 10 हजार रुपयांच्या रकमेसह जेरबंद केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, मनोहर शेजवळ, सुनील चव्हाण, बापू फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप पवार, संदीप घोडके, शंकर चौधरी, भीमराज खर्से, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप शिंदे, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दत्तात्रय कुंडलिक बिरंगळ (रा. सोनेगाव, ता. जामखेड) हे आडत व्यापारी असून दि. 15 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 7 वाजता बिरंगळ व दुकानाचा हमाल गणेश कांबळे (रा. सोनेगांव) असे दोघे बार्शी (जि. सोलापूर) येथून भुसार मालाची विक्री करुन 10 लाख रुपये घेऊन त्यांच्या मोटार सायकलवर गावी येत असताना लोहकरे वस्ती (धनेगाव शिवार, ता. जामखेड) येथे दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीस पाठीमागून बांबूच्या दांडक्याने मारहाण केली व मोटार सायकल चालक गणेश कांबळे यास रोडच्या दुसरे बाजूस ढकलून देऊन त्यांच्याजवळील 10 लाख रुपये बळजबरीने चोरुन नेले होते. याप्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक कटके यांना माहिती मिळाली की, फिर्यादी यांच्याकडे काम करणारा हमाल गणेश कांबळे हा या गुन्हयात सामील आहे व त्यानेच त्याच्या दोन साथीदारांना बिरंगळ हे रोख रक्कम घेऊन येत असल्याची माहिती दिल्याने त्याच्या साथीदारांनी अंगावर बुरखा घालून त्यांना अडवून व मारहाण करुन 10 लाख रुपये बळजबरीने चोरुन नेले आहे. तसेच या गुन्ह्यातील तीनजण मोटारसायकल (एम.एच. 16 सी.एक्स 4608) गुन्हयातील चोरीस गेलेली रक्कम विल्हेवाट लावण्याकरीता घेऊन जात आहेत. कटके यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकाने खर्डा इंग्लिश स्कूल रोडवर वेषांतर करुन सापळा रचला. तुषार उर्फ सोन्या दीपक आल्हाट (वय 19), पृथ्वीराज उर्फ बबलु बाळासाहेब चव्हाण (वय 20), गणेश सुभाष कांबळे (वय 19, तिघे रा. सोनेगाव, ता. जामखेड) यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 7 लाख 10 हजाराची रक्कम व मोटार सायकल जप्त केली.
COMMENTS