पाटण / प्रतिनिधी : पाटण विधानसभा मतदार संघातील अंतर्गत रस्त्यांचा दीर्घकाळापासून प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यां
पाटण / प्रतिनिधी : पाटण विधानसभा मतदार संघातील अंतर्गत रस्त्यांचा दीर्घकाळापासून प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून 5 कोटी 29 लाख 6 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मतदार संघातील 34 गावांमधील अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पाटण विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमधील अंतर्गत रस्ते खराब अवस्थेत असल्याने ग्रामस्थांकडून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे शिफारस केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने शासन निर्णय पारित करून निधी मंजूर केला आहे.
या निधीतून तोरस्करवाडी नाणेगाव स्मशानभूमी रस्ता, धायटी खुडेवाडी, पाठवडे, बोर्गेवाडी (डेरवण), पाबळवाडी, फडतरवाडी घोट स्मशानभूमी, नुने मातंगवस्ती, मारुल तर्फ पाटण, मल्हारपेठ दिंडुकलेवाडी, विहे, केरळ, खालची मेंढोशी, लुगडेवाडी, फणसवाडी, कवडेवाडी, कोळेकरवाडी, हौदाचीवाडी, नाटोशी, मोरेवाडी, आंब्रग, गुंजाळी, त्रिपुडी, नेरळे, मुळगाव, तळीये, शिद्रुकवाडी, चोपदारवाडी, पापर्डे, बहुले, मरळी, सांगवड, तामिणे, नावडी आदी गावांतील अंतर्गत व स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यांच्या सुधारणा, खडीकरण व डांबरीकरणाची कामे केली जाणार आहेत.
ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणार असून, संबंधित यंत्रणांना तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS