Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेत जमीन नावावर केली नाही म्हणून अवघ्या चार वर्षांच्या पुतणीचा घेतला जीव

सोलापूर प्रतिनिधी - आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करून देण्यासाठी सख्या भावाशी झालेल्या वादात पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्काद

भाजपा तर्फे देशभर ८२ तीर्थक्षेत्री कार्यक्रमांचे आयोजन
डाँ.तनपुरे कामगारांसाठी ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन
शिष्यवृत्ती परीक्षा ही एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी :- अभय आव्हाड 

सोलापूर प्रतिनिधी – आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करून देण्यासाठी सख्या भावाशी झालेल्या वादात पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलीय. ज्ञानदा यशोधन धावणे असे चार वर्षीय मृत चिमुकलीचे नाव असून आरोपी काका यशोदीप धाकणे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी असलेल्या यशोधन शिवाजी धावणे यांची वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन आहे. यातील पाच एकर ही त्यांच्या नावे, पाच एकर भाऊ यशोदीप यांच्या नावे तर उर्वरित सहा एकर ही आईच्या नावे आहे. आईच्या नावावर असलेली सहा एकर शेतजमीन ही आपल्या नावावर करून द्यावी यासाठी आरोपी यशोदीप हा सातत्याने भांडण करत होता. गावातील लोकांनी बैठक घेतं त्याची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. याच कारणावरून सोमवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात पुन्हा एकदा भांडण झाले. आईच्या नावावर असलेली 6 एकर जमीन वाटणी न करण्यात तुम्ही पती – पत्नी जबाबदार असून आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीप याने यशोधनला शिवीगाळ केली. तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकी दिली. गावातील लोकांनी मध्यस्ती करत दोघांना शांत केले. त्यानंतर मृत ज्ञानदाचे वडील यशोधन हे आई आणि पत्नीसह शेताला गेले. काही कामा निमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे घरात दिसून आले नाही. त्यामुळं त्यांनी वडील शिवाजी यांना फोन केला असता मी मंदिरात दर्शनासाठी आलो आहे, ज्ञानदा ही घरात झोपलेली असल्याचे सांगितले. मात्र ज्ञानदा घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली असता भाऊ यशोदीप याने ज्ञानदाला गाडीवर नेल्याचे काही जणांनी सांगितले. यावेळी भाऊ यशोदीपला फोन लावल्यानंतर मी तुझ्या मुलीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिले असे सांगितले. यशोधन यांना हे ऐकल्यानंतर धक्का बसला. त्यांनी तात्काळ मालिकपेठला धाव घेतली. तिथे नदी पात्रात ज्ञानदा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी तिला नदीतून काढले. ज्ञानदाला उपचारासाठी मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे शेतीच्या वाटणीच्या वादातून अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या केल्याने सख्या काका विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

COMMENTS