Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या 

नाशिकच्या आश्रम शाळेतील हत्येचं गूढ उकललं भावासोबत झालेल्या भांडणाचा राग चिमुकल्यावर काढला

नाशिक प्रतिनिधी - नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधार तीर्थ आश्रमात एका चार वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 23 नोव्हेंब

चेंबर साफ करताना 2 कामगारांचा मृत्यू
जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या

नाशिक प्रतिनिधी – नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आधार तीर्थ आश्रमात एका चार वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 23 नोव्हेंबरला समोर आली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं या आश्रम शाळेत राहतात, त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेचा तपास त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून सुरू आहे. या आधार आश्रमातील हत्येप्रकरणी अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आधार आश्रमात एका चार वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या करण्यात आली. मोठ्या भावासोबत झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी चार वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली आरोपी अल्पवयीन मुलाने दिली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन संशयिताला याप्रकरणी अटक कली आहे.

COMMENTS