मादळमोही प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील चकलंबा ठाणे हद्दीत तांदळा येथे चोरट्यानी धुमाकूळ माजवला आहे सातत्याने घडणार्या घटनेने गावासह परिसरात दहश
मादळमोही प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील चकलंबा ठाणे हद्दीत तांदळा येथे चोरट्यानी धुमाकूळ माजवला आहे सातत्याने घडणार्या घटनेने गावासह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. 29 ऑगस्ट 2023 मंगळवारी रात्री पाच ठिकाणी घरफोडी केली आहे. एकाच महिन्यात या गावात चार वेळेस चोरी करत लाखो रूपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार होतायत पेट्रोलिंगची गाडी सुरू असताना चोरटे पोलिसांना धूळ चारत आहेत. चकलंबा पोलिसांना तगडे आवहान दिले आहे नागरिकांमध्ये पोलीसाच्यां कार्यक्षमेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दि. 29 मंगळवार रोजी रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग कल्याण- विशाखापट्टणम तांदळा येथे पाच ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली तर दोन तीन ठिकाणी घरातील व्यक्ती जागे झाल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. तांदळा येथील रामकिसन तांबे वयवृद्ध दांपत्याच्या घरात प्रवेश करून घरातील सर्व झडती घेत एक पेटी उचलून घेऊन गेले पेटीत 25 हजार रूपये होते तर सखाराम हाकाळे यांच्या घरी कुणीही नसल्याने घराचे कुलूप तोडून घरातील कपाट तोडून सर्व झडती घेऊन अशोक हाकळे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील पेटी घेऊन गेले तेथून पुढे विठ्ठल भारती यांच्या घराकडे जाऊन ते ज्या रूममध्ये झोपले होते त्या रुमची बाहेरून कडी लावून घेतला आणि दुसर्या रुमचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. एकाच महिन्यात या गावात चार वेळेस चोरी करत लाखो रूपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले आहेत. यासर्व प्रकारामुळे गावातील नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरातील सर्व घटना पाहता चोरट्यांनी चंकलंबा पोलिंसाच्या नाकीनऊ आणले असून, चकलंबा पोलिसांना तगडे आवहान दिले आहे. चकलांबा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे बीट अमंलदार राम बारगजे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास चकलंबा पोलिस करत आहेत. तालुक्यातील तांदळा गावात राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापटनम रात्री रस्त्यालगत असलेल्या घरात पाच ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. दरम्यान गावातील नागरिक जमा झाले असता त्यांना महामार्गावर पाथर्डीकडे जात असलेल्या विना नंबर दोन हिरो स्पेलंडर कंपनीच्या मोटारसायकलवर चार चोरटे आढळून आले त्यांना थांबून विचार पुस केली असता एकाजणाकडे कुकरी व धारदार चाकू सापडला असून चारही चोरटे धारुरचे असल्याची माहिती समोर येत आहे त्यांना संबंधित पोलीस ठाणे चकलंबा यांच्या हवाली करण्यात आले आहे.
COMMENTS