जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे मालापुर रस्त्याला लगत असलेल्या आदिवासी समाजाचे झोपड्या आणि गुरांच्या शेडला दुपारी दोन वाजेच्

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे मालापुर रस्त्याला लगत असलेल्या आदिवासी समाजाचे झोपड्या आणि गुरांच्या शेडला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागल्याने या आगीमध्ये गुरांच्या शेडमध्ये चारा व पत्रे, पाईप, लाकडे असे शेती उपयोगी सामान जळून खाक झाले. या ठिकाणी राहत असलेला रखवालदार यांच्या संसारोपयोगी साहित्य जळाले. तर, शेजारी असलेले दोन झोपड्यांना आग लागल्याने त्यांचे देखील धान्य व संसारोपयोगी सामान जळून खाक झाले हि आग कशामुळे लागली काही समजलं नसल्याने सांगितले यात शेड मालकाचं व झोपड्या जळालेल्या आदिवासी कुटुंबाचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. चोपडा नगर परिषदेचे अग्निशामक आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. परंतु, आग विजवल्यानंतर अग्निशामक नादुरुस्त झाली. चोपडा नगरपरिषदेच्या या अग्निशामक वरून चोपडा शहरातील नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. परंतु चोपडा नगर परिषदेमार्फत या नादुरुस्ती अग्निशामकाचे वापर वारंवार केला जात असल्याने नागरिकांमध्ये याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
COMMENTS