हतगड प्रतिनिधी - सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत स्वीट दुकान व शेजारी असलेले हॉटेल व क

हतगड प्रतिनिधी – सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत स्वीट दुकान व शेजारी असलेले हॉटेल व कोल्ड्रिंक्स दुकानाला आग लागून एकूण 11 लाख रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आग इतकी भयानक होती की, वेळातच स्वीट दुकानात आग चारही बाजूने लागली होती. बोरगाव येथील टँकर मालकांनी टँकर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग नियंत्रणात आणण्यासाठी बोरगाव येथील ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले होते.
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसांमध्ये आग लागल्याने आगे मध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिकांनी बोरगाव येथे अग्निशामक बंब उपलब्ध करून द्यावा यासाठी बोरगाव घाटमाथा बोरगाव येथील चौफुलीवर जवळपास दीड तास रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी अशोक गवळी, भास्कर भोये, तुकाराम कर्डीले, राजू कर्डीले, लक्ष्मण बागुल, पुंडलिक भोये, संदीप भोये, जनार्दन भोये, वसंत भोये, पुंडलिक धुळे आधी नागरिक उपस्थित होते
COMMENTS