केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील डोका येथे रात्रीच्या वेळेस अचानक आग लागून आगीत गोट्यासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक होऊन शेतकर्याचे लाखो रुपया

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील डोका येथे रात्रीच्या वेळेस अचानक आग लागून आगीत गोट्यासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक होऊन शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील डोका येथील बाबासाहेब भागवत भांगे हे सर्वे नंबर 44 मध्ये त्यांच्या कुटुंबासह शेतामध्ये गोठ्यात राहतात परंतु दिनांक 27 मार्च रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या दरम्यान बाबासाहेब भांगे यांचे कुटुंब झोपेत असताना त्यांच्या गोठयाला अचानक आग लागली होती. या आगीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, तुर, कापूस, घरातील कपडे व भांडे यासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून बाबासाहेब भांगे यांचे कुटुंब आज रोजी उघड्यावर पडलेले आहे. सदरील घटनेचा प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी अशी विनंती बाबासाहेब भांगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. सदरील आग नेमकी कशामुळे लागली त्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. सदरील घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS