Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतमजुराची मुलगी झाली वनरक्षक

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील तांबोळी वस्ती येथे राहणार्‍या सादिया पापाभाई तांबोळी  हिची महाराष्ट्र वन विभागात कोल्हापूर वनवृत

शेतकरी दीपक आढावचा आत्महत्येचा प्रयत्न  
नगरला मिळणार रोज 117 दशलक्ष लिटर पाणी ; अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात
शेतकर्‍यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना  

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील तांबोळी वस्ती येथे राहणार्‍या सादिया पापाभाई तांबोळी  हिची महाराष्ट्र वन विभागात कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक पदी निवड झाली. तिने पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश संपादन केले आहे. सादिया पापाभाई तांबोळी हीने कठोर परिश्रम करत जिद्द आणि चिकाटीने गरीब परिस्थितीशी दोन हात करत हे यश मिळवले.आई व वडील पापा भाई तांबोळी यांनी लोकांच्या शेतात मोलमजुरी करत आपल्या मुलांना अतिशय कष्ट घेत शिकवले आहे. तिच्या या निवडीमुळे टाकळी कोपरगाव पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र कौतुक होत आहे. या याप्रसंगी टाकळी चे सरपंच संदीप देवकर मा सभापती सुनील देवकर उपसरपंच संजय देवकर सदस्य शशिकांत देवकर सोसायटीचे चेअरमन रामदास  देवकर व कोसाकाचे माजी संचालक भागवतराव देवकर पोलीस पाटील राजेंद्र देवकर, सोपानराव देवकर, छगनराव देवकर, गणेश देवकर, अमोल देवकर, दत्तात्रय भोसले, सुलेमान तांबोळी, रसूल भाई शेख, शरीफ तांबोळी, जाकीर तांबोळी, शकिल तांबोळी, समिर तांबोळी, सुनील पाईक, चंद्रभान देवकर, नवनाथ देवकर, अमोल भुजबळ आणि बंधु फयाज तांबोळी सह टाकळी ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS