Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून

पुण्याच्या कोंढवा परिसरातील घटना

पुणे ः मित्रानेच दारुच्या नशेत जवळच्या मित्रावर किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून त्याचा निघृण खून करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडल

चाकूने वार करून तरुणाचा केला खून
कैद्यांमध्ये राडा बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या

पुणे ः मित्रानेच दारुच्या नशेत जवळच्या मित्रावर किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून त्याचा निघृण खून करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपीस पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद नसीम उर्फ समीर सईदुल्लाह अन्सारी (वय-37) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी कमल रोहित धुव्र (वय-19, रा. अमानोरा पार्कमागे, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अब्दुल वाहीद हमीद अन्सारी (वय 40, रा. अमानोरा पार्कमागे, हडपसर,पुणे) याने कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. मयत मोहम्मद अन्सारी आणि आरोपी कमल धुव्र हे दोघे बांधकाम मजूर आहेत. मोहम्मद आणि कमल कोंढव्यातील येवलेवाडीत एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या परिसरात दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाल्यावर दारुच्या नशेत कमलने मोहम्मद याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मोहम्मदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस बाबर पुढील तपास करत आहेत. आंबेगाव बुद्रुक मधील टेल्को कॉलनीत रिक्षा पार्क करत असताना रिक्षाचालकासोबत रिक्षा पार्क करण्यावरुन काही जणांनी वाद घालून गैरकायद्याची मंडळी जमा करुन रिक्षाचालक व त्यांचा मुलगा यांचेवर धारदार हत्याराने वार करुन तसेच त्यांचा दगडाने मारुन गंभीर जखमी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तसेच आरोपींनी शिवीगाळ करत बघुन घेण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी निर्मला विश्‍वकर्मा, अक्षय शिंदे, रोहित देशमुख, साहिल व इतर दोन अशा आरोपींवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत वैभव विलास कदम (वय-26) यांनी तक्रार दाखल केली असून त्याच्या वडीलांना व भावाला आरोपींनी मारहाण केली आहे.

COMMENTS