बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. बीड च्या गेवराई मधील रेवकी येथे जन्मदात्या पित्यानेच आपल्या अपंग असलेल्या अल्
बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. बीड च्या गेवराई मधील रेवकी येथे जन्मदात्या पित्यानेच आपल्या अपंग असलेल्या अल्पवयीन मुलीवर आत्याचार केला आहे. पिडित मुलीची आई बाहेरगावी गेली होती. त्यावेळेस अपंग असलेल्या मुलीला शेजारच्या नातेवाईकांजवळ तिला ठेवले होते. याचवेळी आरोपी नराधाम बापानं त्या मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. त्यानंतर आरोपी नराधाम बाप तेथून पळून गेला. या प्रकरणी नराधम बाप विरोधात नातेवाईकाच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नराधम बापाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS