रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गवर कशेडी घाटात आज दुपारी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार डिझेलचा टँकर उलटून अपघात झाला. घाटातील तीव्र उतारात ब्रेक न लागल्यामुळे टँकरला अपघात झाला. या टँकरमध्ये जहाजासाठी इंधन म्हणून वापरले जाणारे डिझेल असल्याने सुरक्षेसाठी पोलिसांनी घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब पाचारण केले होते. सध्या घाटातील वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेत सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.

COMMENTS