Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुतारी गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकार्‍यांची घेतली भेट

बीड : शहरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (पद्धतशीर सघन उजळणी)  मॅपिंग कामासंदर्भात विविध अडचणींचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (तुतारी गट) च

राज्यपाल कोश्यारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या – शरद पवार
महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य ; काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
श्री रूक्मिणीमातेची पालखी पंढरपूरला मार्गस्थ


बीड : शहरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (पद्धतशीर सघन उजळणी)  मॅपिंग कामासंदर्भात विविध अडचणींचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (तुतारी गट) च्या वतीने गटनेते खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी निवेदन देत एस.आय.आर.मॅपिंग विशेष मोहिमेचा कालावधी वाढविण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ऑक्टोबर 2024 च्या मतदार यादीतील मतदारांचे 2005 च्या मतदार यादीतील नोंदींशी मॅपिंग करणे, मतदार यादी अद्ययावत करणे, तसेच डीएसई नोंदणीची पडताळणी करणे अशी महत्त्वाची कामे बी.एल.ओ. मार्फत सुरू आहेत. यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी 10 मार्च 2026 ते 20 मार्च 2026 या कालावधीत बी.एल.ओ. यांना पूर्णवेळ कार्यमुक्त करून काम गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, वोटर-टू-वोटर मॅपिंगचे काम प्रगतीपथावर असले तरी प्रोजेनी मॅपिंगचे काम अद्याप प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महिलांच्या माहेरकडील माहिती मिळवण्याची अडचण, आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि मर्यादित स्रोत यामुळे हे काम विहित कालावधीत पूर्ण होणे कठीण जात असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरी भागातील बी.एल.ओ. यांना एस.आय.आर.मॅपिंगसाठी विशेष मोहिमेचा कालावधी वाढवून देणे अत्यावश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच काही बी.एल.ओ. कामात हलगर्जीपणा करत असल्यास त्यांना सक्त सूचना देऊन कामाची शिस्त राखावी, अशीही विनंती करण्यात आली. या शिष्टमंडळात नगरसेवक अशोक काळे, अय्युब खान, अफसर भाई, मसी भाई, शरीफ मामु, पठाण मकसूद खान, शेख रईस भाई, डॉ. सिराज खान आरजु, मोहंमद हारून, शहेबाज भाई, बुरहान काजी आदी उपस्थित होते.

COMMENTS