Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंगल्याचे सहा कुलपे तोडून धाडसी दरोडा

तिघांना मुद्देमालासह पोलिसांनी घेतले ताब्यात

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील दशक्रियाविधी शेजारील बंद असलेल्या बंगल्याचे सहा कुलपे तोडून घरफोडी करणारे बेलापूर येथील एक व देवळाली प्रवरा

एकतर देवरेंची बदली करा, किंवा आमची तरी करा…; पारनेरच्या महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट
आदिवासी बांधवांसाठी २३१ कोटी अनुदान मंजूर- अमित आगलावे

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील दशक्रियाविधी शेजारील बंद असलेल्या बंगल्याचे सहा कुलपे तोडून घरफोडी करणारे बेलापूर येथील एक व देवळाली प्रवरा येथील दोन जण 30 हजार 500 किमंतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. देवळाली प्रवरा येथील एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
           याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथील दशक्रियाविधी शेजारी राहणारे नाझिम सय्यद हे मुंबई येथे नोकरी निमित्त रहिवाशी असून सुट्टीसाठी देवळाली प्रवरात आले असता बंगल्याचे सहा कुलपे तोडून घरफोडी झाल्याचे लक्षात आले. राहुरी पोलिस ठाण्यात नाझिम सय्यद यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती. घरफोडी करताना चोरट्यांनी दुचाकी वाहन, फॅन, फिलिप्स कंपनीचे स्पीकर, इतर साहित्य असे एकूण 35 हजार 500 रुपये किमंतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.घरफोडीचा तपास करीत असताना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत घरफोडी करणार्‍यांची नावे मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करुन घेतल्यानंतर घरफोडी करणार्‍या बेलापुर येथिल आयोध्या काँलनितील रहिवाशी शाहरुख सांडू सय्यद व देवळाली प्रवरा येथील शाहरुख रहिमतुल्ला शेख, इम्रान रज्जाक् शेख या तीघांनाजेरबंद करण्यात आले. तर देवळाली प्रवरा इस्लामपुरा येथिल जैद मुस्ताक सय्यद हा फरार असुन त्याचा पोलिस शोध घेत आहे. जेरबंद केलेल्या तीन आरोपींना राहुरी न्यायालयाने पोलिस कस्टडी रवानगी केल्यानंतर त्या तिघांनी चोरून नेलेली ऍक्टिवा दुचाकी व फॅन असे एकूण 30हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलिस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, विकास वैराळ, पोलिस नाईक प्रवीण बागुल, गणेश सानप, पो. काँ. प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख, अंकुश भोसले, सतीश कुर्‍हाडे आदींनी केला आहे. पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहे.

COMMENTS