Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंत्राटी कर्मचारी एक हजाराची लाच घेतांना पकडला

शिर्डी प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा कंत्राटी बाह्यस्रोत वायरमन धनंजय गोरख आग्रे वय 28 वर्ष यास व्यावसायिक विज जोडणीचे नवीन विद्

दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने रद्द करावा
भाजपच्या माजी मंत्र्यांच्या मेव्हण्याचा प्रताप ; बनावट दाखल्याआधारे मुलाचा शाळा प्रवेश
पतीने झोपेतच केली पत्नी आणि सासूची हत्या

शिर्डी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा कंत्राटी बाह्यस्रोत वायरमन धनंजय गोरख आग्रे वय 28 वर्ष यास व्यावसायिक विज जोडणीचे नवीन विद्युत मीटर बसवून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहाता तालुक्यातील राजुरी येथे रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतचे वृत्त असे की राहाता तालुक्यातील राजुरी येथे नव्याने बेकरी व्यवसाय सुरू केलेल्या ग्राहकास नवीन व्यवसायिक वीज जोडणी कनेक्शन घेतले आहे. सदर वीज जोडणी व नवीन विद्युत मीटर करिता आवश्यक असणारे अधिकृत कोटेशन व शुल्क  ग्राहकाने भरले आहे.बेकरीच्या  ठिकाणी नवीन व्यावसायिक वीज जोडणीचे मीटर लावून देणे करता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बाभळेश्‍वर सेक्शन मधील बाह्य स्रोत वायरमन आरोपी लोकसेवक धनंजय गोरख आग्रे वय 28वर्ष याने संबंधित ग्राहकाकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती 1000 रुपये लाच देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने यासंदर्भात अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संदर्भात पडताळणी करत कारवाई सुरू करून बाह्य स्रोत वायरमन असलेला आरोपी धनंजय गोरख आग्रे याला सापळा लावला होता. दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपी धनंजय गोरख आग्रे हा 1 हजार रुपयांची लाच पंचां समक्ष स्वीकारताना राजुरी येथे लावलेल्या सापळ्यात रंगेहात पकडला गेला.ही कारवाई लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक प्रतिबंधक विभाग नाशिक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अहमदनगर येथील पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोरडे, तसेच महिला पोलीस नाईक राधा खेमनर ,पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, पोलीस हवालदार हरून शेख यांनी कारवाई करून हा सापळा यशस्वी केला आहे.

COMMENTS