Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलासाठी बापाचं देणं कधीच फिटत नाही-डॉ.सुरेश मुंडे

बीड : मुलासाठी बापाचं देणं कधीच फिटत नाही, असे भावूक उद्गार रेणू हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुरेश मुंडे यांनी काढत पितृत्वाच्या नात्यावर हृदयस्पर्शी भ

शिक्षण अधिकार्‍यांच्या आडमुठपणामुळे शिक्षकांची पेन्शन रखडलीसेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात – सूर्यकांत जोगदंड
शेतकरी, बेरोजगारी अन् बीडच्या विकासावर खा.सोनवणेंनी संसदेत उठविला आवाज; लोकसभा अध्यक्षाविरूध्द आलेल्या अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थही केले मुद्देसूद भाषण
अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जागीच ठार; वनरक्षक महेश मेटे यांना कळविले-डॉ. गणेश ढवळे


बीड : मुलासाठी बापाचं देणं कधीच फिटत नाही, असे भावूक उद्गार रेणू हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुरेश मुंडे यांनी काढत पितृत्वाच्या नात्यावर हृदयस्पर्शी भाष्य केले. मुलाच्या भविष्यासाठी आयुष्यभर झटणारा बाप स्वतःच्या सुखाचा त्याग करून मुलाच्या आयुष्याची पायाभरणी करत असतो, मात्र त्याला नेहमीच वाटत राहतं की आपण अजून काहीतरी करायला हवं होतं, असे त्यांनी सांगितले.
डॉ. मुंडे म्हणाले की, समाजात आईच्या मायेबद्दल मोठ्या प्रमाणावर बोलले जाते, पण बापाचा संघर्ष अनेकदा दुर्लक्षित राहतो. बाप हा नारळासारखा असतो-बाहेरून कठीण, पण आतून अत्यंत हळवा. मुलांच्या प्रगतीसाठी तो आयुष्यभर झगडत राहतो. आजच्या धावपळीच्या जीवनात मुले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहतात, तरीही बापाला त्यांच्यासाठी अधिक काही करण्याची ओढ कायम असते. मुलांना सर्व सुखसोयी मिळाव्यात, हीच त्याची आयुष्यभराची धडपड असते, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी तरुण पिढीला महत्त्वाचा सल्ला देत सांगितले की, वडिलांनी केलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्याशी प्रेमाने संवाद राखणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे. रेणू हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करताना कौटुंबिक नात्यांचे अनेक पैलू अनुभवायला मिळतात. त्याच अनुभवातून हे विचार मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भावनिक विधानाची बीडमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

COMMENTS