Homeताज्या बातम्यादेश

दानपेटीत सापडला 100 कोटींचा धनादेश

आंध्रप्रदेश प्रतिनिधी - दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील सिंहाचलम टेकडीवर असलेल्या श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात एका

उन्हाची तीव्रता; निसर्ग सौंदर्य आणि पशू-पक्ष्यांना जपा !
जितका प्रवास तितकाच पथकर !
युक्रेनची गोची आणि युरोपला संधी

आंध्रप्रदेश प्रतिनिधी – दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील सिंहाचलम टेकडीवर असलेल्या श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात एका भक्ताने प्रभूची फसवणूक केली. वास्तविक, भक्ताने 100 कोटी रुपयांचा धनादेश मंदिराच्या दानपेटीत टाकला. विशाखापट्टणमचे श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दानपेटीत धनादेश आढळून आल्यावर त्यांनी तो कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नेला. हे पाहिल्यानंतरच त्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी संबंधित बँकेच्या शाखेतील अधिकार्‍यांना देणगीदाराच्या खात्यात खरोखर 100 कोटी रुपये आहेत का ते तपासण्यास सांगितले. मंदिर प्रशासनाने धनादेश संबंधित बँकेला पाठवला असता, भक्ताच्या खात्यात केवळ 17 रुपये असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. धनादेशाचे छायाचित्र गुरुवारी सोशल मीडियावर समोर आले

COMMENTS