बीड/प्रतिनिधी ः चार वर्षापूर्वी माझा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला, तसा तो अनेकांचा झाला होता. त्या पराभूतांना आमदारकी, मंत्रिपदे देवून त
बीड/प्रतिनिधी ः चार वर्षापूर्वी माझा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला, तसा तो अनेकांचा झाला होता. त्या पराभूतांना आमदारकी, मंत्रिपदे देवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले, मात्र मला राज्यात कोणतीही संधी मिळू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याची आक्रमक टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावरून केली. भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित सभेत त्या बोलत होत्या. आपल्याला सातत्याने डावलण्या येत असल्यामुळे आपण यावर माझे नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मला माझा नेता मिळाला असून, त्यांच्याशी मी चर्चा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
मी अमित शहा यांची भेट घेणार आहे. अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पंकजा म्हणाल्या. माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कुणासमोरही झुकणार नाही, मला पहिल्या पाच वर्षाच्या राजकीय जीवनात जे अनुभव आले ते फार अनोखे आहेत. मी आज माझ्या पित्याच्या पुण्यस्मरणामध्ये त्यांच्या आठवणी, अश्रू दाबून आलेल्या नेत्यांचे मनात आभार मानून मी बोलायचा प्रयत्न करते. पण मी बोलायचा प्रयत्न करत असतांना माझ्या मनामध्ये जर सतत विचार केला की, माझ्या बोलण्याचे नेमके काय अर्थ निघतील? तर गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित राजकारण मी करु शकणार नाही. ज्यादिवशी मी समोरच्या माणासाला आवडेल ते बोलणार नाही त्यादिवशी मला राजकारणाच्या मंचावर उभे राहण्याचा अधिकार नाही. म्हणून आज माध्यमे माझ्या मागे आहेत. मी त्यांचे आभार मानते. त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. कारण माझे म्हणणे त्यांनी योग्य ठिकाणी पोहोचवले. माझ्या माणसापर्यंत ते बरोबर पोहोचले. त्यामुळे त्यांना आज वाटते की, ताई काय बोलणार, असे पंकजा आपल्या भाषणात म्हणाल्या.
माझे शब्द लेचेपेचे नाही- एकाच विषयावर पुन्हा-पुन्हा बोलावे, एवढे माझे शब्द लेचेपेचे नाही. मी आजपर्यंत अनेकदा माझी भूमिका स्पष्टपणे घेतलली आहे. माझे शब्द ठाम असतात. एकदा सोडलेला बाण पुन्हा मागे घेता येत नाही. त्यामुळे मी जे काही बोलते, त्यावर ठाम राहत असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. राजकारणात कधीकधी कीर्तन करायला हवे असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मला रामायण आणि महाभारत यातील दाखले आवडतात. मला स्वच्छ आणि कोरी पाटी असलेला चेहरा हवा आहे, असे म्हणत गोपीनाथ मुंडे यांनी 2004 मध्ये मला प्रचारासाठी उभे केले. मी गेले 19 वर्षापासून राजकारण करत असल्याचे पंकजा मुंडे सांगितले.
मी कोणासमोर झुकणार नाही – मी कुणासमोरच कधीच झुकणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे यांच्या या वाक्याचा मी पुन्हा-पुन्हा उच्चार करते. कारण माझे राजकारण माझ्यासाठी किंवा माझ्या कुंटुंबासाठी नाही, तर माझ्या मतदारांसाठी आहे, तुमच्यासाठी असल्याचे पंकजा मुंडे यांनी उपस्थित नेत्यांना सांगितले. मी राजकारणात आले ते केवळ आणि केवळ लोकांचे भले करण्यासाठी. माझ्या परिवारासाठी राजकारणात आलेले नाही.
COMMENTS