Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पाथर्डी ः पाथर्डी शहरातील जुने बस स्थानकासमोर निलेश लंके साहेब यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा फलक लावून आदर्श आचारसंहिता 2

साईनगरीत 29 व 30 एप्रिलला शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन ः डॉ. संजय मोरे
सचोटीने कारभार केल्यास संस्थेची हमखास प्रगती : करण ससाणे
राहात्यातील विद्यार्थ्यांची मर्दानी खेळांसाठी निवड

पाथर्डी ः पाथर्डी शहरातील जुने बस स्थानकासमोर निलेश लंके साहेब यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा फलक लावून आदर्श आचारसंहिता 2024 चे उल्लंघन केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तनविर भैय्या अतार यांच्यावर महाराष्ट्र मालमत्तेचे विरुपिकरण अधिनिअम 1995 चे कलम 3 प्रमाणे गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी निलेश झिरपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,गुरुवारी सायंकाळी आचारसंहिता कक्ष प्रमुख राजेश कदम (गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव) यांचा फोन आला व त्यांनी फोनद्वारे कळविले की पाथर्डी शहरात आदर्श आचारसंहिता 2024 चे उल्लंघन करणारे फलक लावले असून त्यावर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातुन मा.श्री निलेश लंके साहेब यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक मा.तनविर भैय्या अतार मित्र परिवार, अशा मजकुर असून तिथे जावुन कायदेशीर कारवाई करावी असे कळविले त्यानंतर पाथर्डी येथे जाऊन कक्ष प्रमुख राजेश कदम यांनी सांगितल्या प्रमाणेच असल्याचे खात्री झाल्याने नगर परिषद पाथर्डी येथील कर्मचारी ढवळे व त्यांचे सहकारी यांचे मदतिने बॅनर खाली घेवून आचारसंहिता कक्ष प्रमुख राजेश कदम (गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव) यांचे सुचनेवरून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे जावून आदर्श आचार संहिता 2024 चे उल्लंघन करणारे तनविर भैय्या अतार रा पाथर्डी जिल्हा अहमदनगर याचे विरुध्द महाराष्ट्र मालमत्तेचे विरुपिकरण अधिनिअम 1995 चे कलम 3 प्रमाणे फिर्याद आहे.

COMMENTS