Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

श्रीगोंदा शहर ः श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेने आपल्यावर बलात्कार झाल्याची फिर्याद दिल्याने सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड  श्रीगोंदा यांन

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा  
तुमचे आजचे राशीचक्र बुधवार, ०९ जून २०२१ l पहा LokNews24
तब्बल 42 तोळे सोने हस्तगत…सतरा घरफोड्या उघडकीस

श्रीगोंदा शहर ः श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेने आपल्यावर बलात्कार झाल्याची फिर्याद दिल्याने सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड  श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब उत्तम दांगडे राहणार घुगलवडगाव तालुका श्रीगोंदा यांच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गु.र.नं 560/2024 नुसार भा.दं.वि.क. 376, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 02 जून 2024 रोजी सायंकाळी 07.00 वा दरम्यान फिर्यादी वैष्णवी गलांडे या आपल्या घुगलवडगाव शिवारातील भुईमुगाचे शेतात एकट्याच शेंगा काढत तो असताना आरोपी भाऊसाहेब दांगडे तेथे आले व मागील तीन वर्षांपूर्वी दिलेली केस 15 मे 2024 रोजी कोर्टात मिटवून का घेतली नाही. तु जर केस मिटवून घेतली नाही तर तुला व तुझ्या दोन्ही मुलांना जीवे ठार मारीन ? तुझ्या घरात दिवा लावायला माणूस ठेवणार नाही अशी धमकी देवुन आरोपी याने फिर्यादीचे छातीमध्ये पोटात कमरेला लाथाबुक्यांनी मारहाण करुन,क ाहीतरी धारधार वस्तुने फिर्यादीचे डाव्या पायांचे मांडीवर, व डावे छातीवर वरील बाजुस मारुन जखमी करुन फिर्यादीने आरडा ओरड केली असता आरोपी याने फिर्यादीचे तोंड दाबुन फिर्यादीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी यांचे ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे नोंदविण्यात आलेल्या दवाखाना जबाबवरुन गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले, श्रीगोंदा पोलिस स्टेशन व तपासी अधिकारी पोसई संपत कन्हेरे पुढील तपास करीत आहेत. 

COMMENTS