Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेला ज

घोगरगाव वीज सबस्टेशनला मंजुरी; नामदार तनपुरे यांनी दिले आदेश
आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट
संतापलेल्या नागरिकांनी केली रस्त्याची चोरी

पुणे : विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उपनिरीक्षकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक युवराज वामन शिंदे, तसेच त्याची पत्नी काजल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची उपनिरीक्षक शिंदे याच्याशी ओळख झाली होती. शिंदे याने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला सातारा रस्त्यावर एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिलेचा विश्‍वास संपादन करून तिच्याकडून वेळोवेळी महागड्या भेटवस्तू घेतल्या. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर शिंदेने तिच्याशी असलेले संबंध तोडले. महिलेने जाब विचारल्यानंतर शिंदेच्या पत्नीने जातीवाचक शिवीगाळ केली. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी स्वारगेट पोलिस ठाण्यात तपासासाठी सोपविण्यात आला. स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.

COMMENTS