Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेपर फुटी प्रकरणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बुलढाणा प्रतिनिधी - साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग होणार.बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणित विषयाचा पेपर निर्धारित वेळेच्या अर्ध्या त

पोतलेत स्वयंभू मारूती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला
जीवघेण्या विषाणूचा भारतात आढळला आणखी एक रुग्ण
पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

बुलढाणा प्रतिनिधी – साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग होणार.बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणित विषयाचा पेपर निर्धारित वेळेच्या अर्ध्या तासापूर्वीच बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली होती, सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव परीक्षा केंद्रावरून हा पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे, या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून गंभीर देखील घेऊन सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून, राजेगाव हे साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा गुन्हा साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.तर विभागीय परीक्षा मंडळाचे सहसचिव आणि शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी परीक्षा वितरण केंद्र सह तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांचे संचालक बदलले असून विभागीय परीक्षा मंडळाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे…त्यावरून तूर्तास विद्यापीठ, परीक्षा मंडळ गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम १९८२ च्या कलम ५ व ६ नुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS