Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये अवैध वाळू उपसाप्रकरणी गुन्हा दाखल

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध असतांना वारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रातून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठ

नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक ताकतीने लढवणार : दत्तात्रय पानसरे
कुमार जगताप यांना जीवे मारण्याची धमकी ; कुळधरणमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सरपंच पूजा सूर्यवंशी यांची ’यशदा’च्या प्रशिक्षणासाठी निवड

कोपरगाव ः कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध असतांना वारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदी पात्रातून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अवैध वाळू उपसा करून तो नेत असताना आरोपी किरण शांताराम लासुरे  (वय-26) याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी त्याचा ट्रॉलीसह पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर आणि त्यातील वाळू असा 03 लाख 10 हजाराचा अवैज जप्त केला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील वाळू लिलाव व बेकायदा वाळू उपसा यामागील राजकारण व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण दि.01 मे 2023 पासून हाती घेतले होते.त्याची अंमलबजावणी होण्यास काही महिने लागले ती काही महिने झाले नाही तोच सरकारने आचारसंहिता लागण्या आधी वाळूचे दर बेसुमाररित्या वाढवले असून आत अधिकृत वाळू जवळपास 4 हजार 500 रुपया पर्यंत पोहचली आहे.यात सामान्य माणसाला सलवतीच्या दरात वाळू मिळण्याचे स्वप्न हे दिवास्वप्न ठरले आहे.त्यात लाभार्थ्यांच्या ऐवजी संबंधित मंत्री आणि महसुली अधिकार्‍यांची चांदी झाल्याचे दुर्दैवाने नागरिकांना पाहायला मिळाले आहे.व सहाशे रुपये दराची वाळू हि दिवास्वप्न ठरले असल्याने नागरिकांत मोठी नाराजी आहे.त्यामुळे स्वाभाविकच चोरटी वाळूस बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव,राहाता तालुका त्यास अपवाद नाही.त्यामुळे वाळू डेपो आणि उपसा केंद्राच्या ठिकाणी चोरटी वाळू मोठ्या प्रमाणावर होत आहे.त्यासंबंधी सुरेगाव,सांगवी परिसरातील शेतकर्‍यांनी अनेक वेळा ही वाळू बंद करण्याची अनेकवेळा निवेदने आणि लेखी इशारे देऊनही कोणताही परिणाम झालेला नाही हे विशेष ! उलट संबंधित यंत्रणांनी हे कॅमेरे बंद करून किंवा ते फिरवून चालुच ठेवली असल्याचे दिसून आले आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात वारी गावात उक्कडगाव देवी मंदिरासमोर उघड झाली असून यातील शिंगवे येथील रहिवासी असलेला आरोपी किरण लासुरे याने आपल्या 03 लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरसह ट्रॉलीच्या सहाय्याने ही चोरी केली आहे.त्या ट्रॉलीतील 10 हजार रुपये किमतीची 02 ब्रास वाळू जप्त केली आहे.सदर घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार ए.आर.वाघूरे यांनी भेट दिली आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ यांनी गुन्हा क्र.197/2024 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वाखुरे हे करीत आहेत.

COMMENTS