Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मुख्यमंत्र्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल  

ठाणे प्रतिनिधी -  राज्यातील सत्ता हातातून निसटून गेल्यावर ठाण्यात ठाकरे गटाकडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नको त्या भाषेत ट

 वैभवशाली प्राचीन लिपीच्या द्वितीय दिवाळी अंकाचे प्रकाशन
शिंदे गटाकडून व्हीपप्रकरणी शिवसेनेच्या आमदारांविरोधात तक्रार
 सर्वोदय विदया मंदिर येथे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष-2023 साजरे

ठाणे प्रतिनिधी –  राज्यातील सत्ता हातातून निसटून गेल्यावर ठाण्यात ठाकरे गटाकडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नको त्या भाषेत टीका केली जात आहे. अत्यंत खालच्या थराला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी वक्तव्यं करत आहेत. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी देखील अशीच बरळ काही दिवसांपूर्वी ओकली होती. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली होती, त्यामुळे वागळे इस्टेट पोलीस स्टेशन मध्ये संजय घाडीगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे समन्वयक एकनाथ भोईर, आयटी विभाग प्रमुख शैलेश कदम आणि माजी परिवहन सदस्य दशरथ यादव यांनी गुरूवारी रात्री उशिरा ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. ठाकरे गटाकडून वारंवार मुख्यमंत्री शिंदेंना टीका करून बदनाम केले जात असून  शिंदे यांच्याबद्धल आक्षपार्ह विधान करण्याची स्पर्धा जणू विरोधकांनी सुरू केली आहे. मात्र विरोधकांच्या या टीकेने महाराष्ट्रतील तमाम शिवसनिकांच्या व नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असून संपूर्ण महाराष्ट्रभर असंतोषाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे गटातून केला जात आहे.  त्यामूळे समाजात तेढ निर्माण करणे आणि आक्षपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

COMMENTS