Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतात मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीं वर गुन्हा दाखल

बुलढाणा प्रतिनिधी - ठोक्याने घेतलेल्या शेतात हरभरा सोंगत असताना तीन जणांनी येऊन महिलांना काठीने मारहाण करून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या

कोपरगावात शिवजन्मोत्सव उत्साहात होणार साजरा
राष्ट्रवादी कडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न | LOK News 24
हिंगोलीतील शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

बुलढाणा प्रतिनिधी – ठोक्याने घेतलेल्या शेतात हरभरा सोंगत असताना तीन जणांनी येऊन महिलांना काठीने मारहाण करून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात माजी जिल्हा परिषद सदस्या सह 3 जणांवर पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बुलढाणा शहरातील जोहर नगर भागात राहणाऱ्या 22 वर्षीय महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांनी येळगाव शिवारातील प्रितेश संचेती यांचा शेत ठोक्याने घेतला असून त्यात हरभरा पेरलेला आहे. आज 16 फेब्रुवारीला काही मजूर घेऊन ते शेतात गेले असता त्या ठिकाणी आरोपी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सिनकर त्यांचे वडील व मुलगा यांच्या सोबत शेतात आले व हरभरा कसा काढता असे म्हणत शिवीगाळ केली, तेव्हा फिर्यादीने त्यांना सांगितले की हे शेत ठोक्याने घेतलेले आहे. त्यामुळे सुरेश सिनकर याने त्याच्या जवळील काठीने मारायला सुरुवात केली व ओढत खाली पाडले त्यावेळी इतर महिला सोडविण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा तिन्ही आरोपींनी शिवीगाळ करून लोटपाट करत खाली पाडले तसेच त्यांना देखील काठीने मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या सोबत आलेली एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी सुरेश सिनकर याने शिवीगाळ करत तिचा हात धरून तिला बाजूला ओढत नेऊन वाईट उद्देशाने पकडून त्याचा विनयभंग केला अशा तक्रारीवरून आरोपी सुरेश सिनकर त्यांचे वडील व मुलगा या तिन्ही विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात विनयभंग पोक्सो व इतर कलमा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलडाणा शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली आहे.

COMMENTS