Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाभूळसर खुर्दमध्ये विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

  पुणे प्रतिनिधी - बाभूळसर खुर्द ता. शिरुर येथे विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे विवाहितेचे प

श्रीगोंदे बाजाराची दयनीय अवस्था
शनेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीने ; रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू
तुळजाभवानी मातेच्या कमानीमुळे राहुरीच्या वैभवात भर

  पुणे प्रतिनिधी – बाभूळसर खुर्द ता. शिरुर येथे विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे विवाहितेचे पती धीरज रामदास फंड, सासरे रामदास बाळासाहेब फंड, सासू कुसुम रामदास फंड, नणंद शितल किरण गोरडे व कोमल कुमार पाचंगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाभूळसर खुर्द ता. शिरुर येथील किमल फंड या विवाहितेच्या विवाहानंतर तिला सासरच्या मंडळीनी काही दिवस चांगली वागणूक दिली त्यांनतर विवाहितेला काही कारण काढून शिवीगाळ, दमदाटी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली, त्यांनतर विवाहितेचे पती व सासरे यांसह आदी लोकांनी तुझ्या आई वडिलांना तुला भेटायला यायचे असेल तर त्यांनी आम्हाला आम्ही तुझ्या बाळंतपणासाठी खर्च केलेले दोन लाख रुपये आम्हाला द्यायचे तरच आम्ही त्यांना तुला भेटू देऊ असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला, घडलेल्या प्रकाराबाबत त्रस्त झालेल्या कोमल धीरज फंड वय २२ वर्षे सध्या रा. करडे ता. शिरुर जि. पुणे या विवाहितेने याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरुर पोलिसांनी विवाहितेचे पती धीरज रामदास फंड, सासरे रामदास बाळासाहेब फंड, सासू कुसुम रामदास फंड सर्व रा. बाभूळसर खुर्द ता. शिरुर जि. पुणे नणंद शितल किरण गोरडे रा. शास्ताबाद मलठण ता. शिरुर जि. पुणे व कोमल कुमार पाचंगे रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले हे करत आहे.

COMMENTS