Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल

डिलाईल रोड पुलाचं उद्धाटन प्रकरणी मनपाची आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार

मुंबई प्रतिनिधी - डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात

“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय”
“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”
जनतेच्या पैशातून सरकारचे परदेश दौरे ः आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

मुंबई प्रतिनिधी – डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. या विरोधात आता मुंबई महापालिका अॅक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळतेय. डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेले होतं. असं असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.

COMMENTS