जयपूर : योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानात गुन्हा दाखल करण्यात आला. बाबा रामदेव यांच्यावर धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपाखाली स्थानिक

जयपूर : योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानात गुन्हा दाखल करण्यात आला. बाबा रामदेव यांच्यावर धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपाखाली स्थानिक नागरिकाच्या तक्रारीनंतर बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामदेव बाबा यांनी एका कार्यक्रमात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करताना मुस्लिम धर्मियांबद्दल विधान केले होते.
रामदेव बाबा यांचा गेल्या 2 दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बाबा रामदेव म्हणालेत की, इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज पठण करणे आहे. इस्लाम धर्मात 5 वेळा नमाज पठण केल्यावर काहीपण करु शकता. मग हिंदू मुलींना उचलून न्या अथवा दहशतवादी बनून मनात येईल ते करा. पाचवेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल तर, अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापे धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असे होत नाही. असं कुराण आणि बायबलमध्ये लिहले नाही. मात्र, असे सांगितले जाते, असे बाबा रामदेव या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात. हा व्हिडिओ राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील असून एका स्थानिक नागरिकाच्या तक्रारीनंतर बाबा रामदेव यांच्याविरोधात भादंविच्या कलम 153 अ, 295 अ आणि 298 अंतर्गत धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS