रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन

मुंबई, दि. 25 : मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को, रशिया या संस्थेच्या प्रांगणात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ स

अहंकार सोडून विशेष अधिवेशन बोलवा… मनसेच्या आमदारांची मागणी
क्रूरतेचा कळस : १४ वर्षीय मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार…
चंद्रकांत पाटलांमुळे राज्याचं मनोरंजन होतंय… त्यांच्यावर करमणूक कर लावा

मुंबई, दि. 25 : मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को, रशिया या संस्थेच्या प्रांगणात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसविल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन करण्यात आले. 2020 हे वर्ष अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यांचा रशियात अर्धाकृती पुतळा बसविणे ही बाब देशाची शान व मान वाढणारी आहे. त्यामुळे विधानपरिषद आणि विधानसभेत या संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. हा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत करण्यात आला.

COMMENTS