Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत साईंच्या जयघोषात रंगांची उधळण

साईबाबांच्या रथाची मिरवणूक काढत रंगपंचमी जल्लोषात

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डीत दरवर्षाप्रमाणे यावर्षीही रंगपंचमी विविध रंगांची उधळण करत मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे साई

जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी अडवणूक, देहर्‍याच्या युवकाने केली आत्महत्या
चोरीची मोपेड विकणारा अटकेत  
दुसर्‍यांच्या वेदना वाटून घेण्याइतके दुसरे पुण्य नाही

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डीत दरवर्षाप्रमाणे यावर्षीही रंगपंचमी विविध रंगांची उधळण करत मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे साईबाबा संस्थानच्या वतीनेही श्री साईबाबांच्या रथाची विविध रंगांची उधळण करत, साई नामाच्या गजरात गावातून रंगपंचमीला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
शिर्डी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री साईबाबा संस्थानच्या वतीने रंगपंचमीनिमित्त श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. हजारो साई भक्त, ग्रामस्थ या श्री साईबाबांच्या रथाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. श्री साईबाबांचा जयजयकार, विविध रंगांची उधळण करत ही मिरवणूक श्री साई मंदिरापासून निघून गावातून परत मंदिर परिसरात आली. हजारो महिला पुरुष साईभक्त ग्रामस्थ या मिरवणुकीत मोठ्या भक्तीमय वातावरणात सहभागी झाले होते.दर रंगपंचमीला श्री साईबाबांची गावातून निघणारी ही रथाची मिरवणूक एक आकर्षण असते. त्यामुळे या रंगपंचमीला रथ मिरवणुकीसाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येत असतात. यावेळी अनेक साईभक्त शिर्डीत रंगपंचमीला आले होते. या रथ मिरवणुकीच्या वेळी साई संस्थांनचे संरक्षण आधिकारी अण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, त्याचप्रमाणे संस्थांनचे पुजारी, सुरक्षा कर्मचारी, साईभक्त व ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिर्डीत विविध संघटना यांच्या वतीने ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिर्डीत शहरांमध्ये चौकात चौकात ठिकठिकाणी संगीताच्या तालावर विविध रंगांची उधळण करत हजारो तरुण रंग उधळत बेफान नृत्य करत रंगपंचमीचा आनंद घेत होते. शिर्डी शहरासह परिसरातही रंगपंचमीचा उत्साह यावर्षी मोठा दिसून येत होता. शिर्डी व परिसरातील गावांमध्ये दुपारनंतर अनेकांनी आपापली दुकाने ,आस्थापने स्वतःहून बंद करून रंगपंचमी साजरी केली. शिर्डी व परिसरात रंगपंचमी शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी झाली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS