Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी  

बीड शहरात मोबाईलची जबरी चोरी करणारे जेरबंद

बीड प्रतिनिधी - दिनांक 12/06/2023 रोजी सायंकाळी 06.30 वा. चे सुमारास फिर्यादी आरती अविनाश नेमाणे वय 31 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. लक्ष्मणनगर ल

छत्तीसगडमध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
जामीन मंजूर झाल्यावरही नेपाळमधील तरुण राहिला कारागृहात
प्रदीप कुरुलकरांनी महिलांचे लैंगिक शोषण

बीड प्रतिनिधी – दिनांक 12/06/2023 रोजी सायंकाळी 06.30 वा. चे सुमारास फिर्यादी आरती अविनाश नेमाणे वय 31 वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. लक्ष्मणनगर लेंडी रोड बीड या जगदंबा अर्बन बँक, बाजीराव कॉम्पलेक्स बार्शी रोड येथुन मोबाईलवर बोलत घराकडे जात असताना पाठीमागुन मोटार सायकलवरुन एक इसम भराधाव वेगात आला व त्याने माझ हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावुन घेऊन निघुन गेला आहे वगैरे मजकुराचे फिर्यादवरून पो.स्टे. शिवाजीनगर गुरनं 313/20233 कलम 392 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तसेच दुपारी 03.00 वा. चे समारास अभिषेक पंडित साबळे वय 23 वर्ष व्यवसाय शिक्षण रा. पालवन हे यशोदा लॉज बार्शी रोड समोरुन पालवण गावाकडे सायकलवरुन मोबाईलवर बोलत जात असताना पाठीमागुन मोटार सायकलवरुन एक इसम भराधाव वेगात आला व त्याने माझे हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावुन घेऊन निघुन गेला. वगैरे मजकुराचे फिर्यादी वरुन शिवाजीनगर येथे नं313/ 2023 कलम 392 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदरची बाब गंभीरतेने घेवून मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी वरील घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. सदर गुन्हयाचे अनुषंगाने पो. नि. स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथकाने घटनास्थळी भेट देवून आरोपीचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा 1) सय्यद बखतीयार अली मंजुरअली रा. शहिशवली दर्गा इस्लामपुरा बीड यांनी केला आहे. तो तेलगाव नाका, बीड येथे मोटार सायकल वर थाबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाले सदर ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्हयातील मोबाईल व इतर तीन मोबाईल पंचा समक्ष जप्त केले आहेत. सदर आरोपी नामे 1) सय्यद बखतीयार अली मंजुरअली वय 36 वर्ष रा. शहिशवली दर्गा इस्लामपुरा, बीड – याचे कडुन पो.स्टे. शिवाजीनगर बीड गुरनं 313 / 2023 कलम 392 भादंवि व इतर दोन गुन्हे उघडकीस येऊन आरोपी कडुन मोटार सायकल, मोबाईल असा एकुण 50,000/- रु. चा मुददेमाल जप्त केला आहे. पुढील तपास पो.स्टे.. शिवाजीनगर व स्था.गु.शा., बीड चे पथक करीत आहे. आरोपीतांकडुन अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरिक्षक सतिष वाघ, पोउपनि भगतसिंग दुलत, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, सलिम शेख, पोना – सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, पोकों/विकी सुरवसे, सचिन आंधळे, अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

COMMENTS