मंडल आयोगापेक्षाही मोठी लढाई लढावी लागणार : अ‍ॅड आंबेडकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंडल आयोगापेक्षाही मोठी लढाई लढावी लागणार : अ‍ॅड आंबेडकर

मुंबई :ओबीसी समाजाची मुद्दामहून गळचेपी करण्यात येत आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, त्यांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी य

चाळीस कामगार अजूनही बोगद्यातच अडकलेले
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून योग्य दिशेने मार्गक्रमण करावे – भटनागर
मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्राला अग्रस्थानी आणावे

मुंबई :ओबीसी समाजाची मुद्दामहून गळचेपी करण्यात येत आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, त्यांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी वंचितचे नेते अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. तसेच ओबीसींचा हा लढा आज विधानभवनापासून सुरूवात झाली असली तरी हा लढा आता गावपातळीवर नेण्यात येईल असा इशारा देखील आंबेडकर यांनी दिला. या दोन्ही सरकारांना ओबीसींना आरक्षणच द्यायचे नाही, असा दावा आंबेडकर यांनी केला. मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई लढावी लागणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून, यासाठी वंचित बहूजन आघाडीने थेड विधानभवनावर धडक मारत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनासाठी राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते मोठया प्रमाणावर आले आल्यामुळे त्यांनी संपूर्ण विधानभवन दणाणून सोडले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अडॅ. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे वातावरण काही काळ तापले होते. वंचितच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून सोडला. प्रचंड संख्येने आंदोलक जमल्याने त्यांची धरपकड करण्यात आली. ओबीसींना आरक्षण मिळालच पाहिजे, अशी मागणी करतच हे आंदोलक विधानभवन परिसरात धडकले. अचानक शेकडो कार्यकर्ते आल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी जमाव पांगवायला सुरुवात केली. तसा जमाव अधिक आक्रमक झाला. आंदोलक अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पोलीस आणि आंबेडकरांची चर्चा सुरू असतानाच इकडे आंदोलकांच्या जोरजोरात घोषणाही सुरू होत्या. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची तात्काळ धरपकड करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल, असे ते म्हणाले. या सरकारने केवळ ओबीसीच नव्हे तर मराठा आरक्षणाचंही वाटोळे केले आहे. गरीब मराठ्यांना वार्‍यावर सोडण्याचे काम या सरकारने केले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, वंचितच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विधान भवन परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यालाही आंबेडकरांनी आक्षेप घेतला. कशाच्या पार्श्‍वभूमीवर 144 कलम लावण्यात आले? असा सवाल त्यांनी केला.

COMMENTS