पुणे ः पुण्यातील गजबजलेल्या मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात दुकानांना मोठी आग लागली असून अग्निशामक विभागाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अग्न

पुणे ः पुण्यातील गजबजलेल्या मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात दुकानांना मोठी आग लागली असून अग्निशामक विभागाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अग्निशामक दलाची आठ अग्निशामक वाहने घटनास्थळी दाखल होत, त्यांनी आग नियंत्रणात आणली. या परिसरात असणार्या सुमारे सात ते आठ दुकानांना आग लागली होती.
नेमकी आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या भागात वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर आदींची दुकाने असल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगीत कोणतेही जीवित हानी झालेली नाही. मात्र, सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवार पेठ, जुना बाजार येथे मंगळवारी सकाळी 7.30 वाजता पत्रा आणि लोखंडी शेड असलेले दुमजली अंदाजे 8 ते 10 दुकाने होती. सदर दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या एकुण 8 अग्निशमन वाहने (फायरगाडी व वॉटर टँकर) घटनास्थळी दाखल होऊन 8.30 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणत धोका दुर करण्यात आला होता. घटनास्थळी धूर मोठ्या प्रमाणात होता. दुकानात मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल व इतर साहित्य जास्त प्रमाणात होते. कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.
COMMENTS