दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला

Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी मोठा कट उधळला

2 हजार जिवंत काडतूसं जप्त लाल किल्ल्याभोवती 10 हजार पोलीस तैनात

नवी दिल्लीः - देशाच्या राजधानीतून स्वातंत्र्यदिन दोन दिवसावर आला असतानाच दिल्लीतून 2 हजार जिवंत काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. काडतुसांच्या दोन

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला : राज ठाकरे
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायफळ बोलू नये – विद्या चव्हाण यांचा घणाघात
मुख्य निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळले ?

नवी दिल्लीः – देशाच्या राजधानीतून स्वातंत्र्यदिन दोन दिवसावर आला असतानाच दिल्लीतून 2 हजार जिवंत काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. काडतुसांच्या दोन बॅगांसह 6 आरोपींनाही ताब्यात अटक करण्यात आले आहे. आनंद विहार(Anand Vihar) परिसरातून काडतुसांच्या दोन बॅगा आणि दोन पुरवठा करणाऱ्या दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांकडून आता कसून चौकशी करण्यात येत असून ही 2 हजार जिवंत काडतूसं कोणाला आणि दिल्लीतील कोणत्या भागात पुरवण्यात येत होती त्याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर आता 15 ऑगस्टच्या निमित्ताने हाय अलर्ट जाहीर केला आहे.

COMMENTS