Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात 75 वर्षीय महिलेचा विनयभंग

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरातील पाषाण परिसरात राहणार्‍या 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा घराशेजारी राहणार्‍या इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या व

सोबत मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाणे गुवाहाटीला जाणे हे पुरोगामी महाराष्ट्राला न रुचणारे आहे – जयंत पाटील 
लंकेंनी शपथ घेतली आणि नितीनने घातली पायात चप्पल
कार अपघातात चार जण जागीच ठार | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरातील पाषाण परिसरात राहणार्‍या 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा घराशेजारी राहणार्‍या इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने महिलेस शिवीगाळ करून धक्काबुक्कीही केली आहे. या प्रकरणी आदर्श डोग्रा (रा.पुणे) या आरोपीवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
ही घटना तीन जानेवारी रोजी घडलेला असून ज्येष्ठ महिलेने विलंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पिडित 75 वर्षीय महिला व आरोपी हे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. घटनेच्या दिवशी आरोपीने विनाकारण महिलेच्या घराच्या दारावर लाथा मारल्याने त्यांनी याबाबत शेजार्‍याकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपीने आक्रमकपणे व निर्लज्जपणे महिलेशी धक्काबुक्की करुन तिला शिवीगाळही केली. आरोपीने महिलेचा हात पिरगाळुन त्यांच्या अंगाशी झटापट करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस भालेराव पुढील तपास करत आहे. दरम्यान पुण्यातच घडलेल्या दुसर्‍या घटनेत कॅरमच्या वादातून 26वर्षीय तरूणीचा विनयभंग झाला. मंगळवार पेठेत राहणार्‍या तरुणीचा भाऊ घराजवळ कॅरम खेळत असताना, या परिसरात राहणारे सिध्दार्थ कांबळे व ऋषिकेश जगले हे दोन तरुण त्याठिकाणी आले. त्यांनी आम्ही कॅरम घेऊन जातो असे बोलले असता, तरुणीच्या भावाने त्यांना जाब विचारला. दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यामुळे तरुणीने मारहाण न करण्याबाबत दोघांना सांगितले. परंतु आरोपींनी थेट तरुणीच्या घरात शिरून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

COMMENTS