Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याच्या वादातून 70 वर्षीय वृद्धाला मारहाण

कर्जत/प्रतिनिधी ः जमिनीच्या वादातून 70 वर्षीय वृद्धाला मारहाण केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी शिवारात घडली आहे. काशिनाथ सोनबा दरेकर असे म

तक्रारदाराकडील पुराव्यामुळे आरोपीचा अटकपूर्व फेटाळला
राष्ट्रवादी चित्रपट, कला, साहित्य व सांस्कृतिक सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी रियाज पठाण
कोपरगावमध्ये तब्बल 16 लाखांचा गुटखा जप्त

कर्जत/प्रतिनिधी ः जमिनीच्या वादातून 70 वर्षीय वृद्धाला मारहाण केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी शिवारात घडली आहे. काशिनाथ सोनबा दरेकर असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याप्रकरणी दरेकर यांनी चौघांविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कोपर्डी येथील नामदेव बाबा दरेकर, दत्तू सखाराम दरेकर, रावसाहेब नामदेव दरेकर, भाऊसाहेब नामदेव दरेकर यांनी पाईपलाईन उकरून त्याचा मुरूम काशिनाथ दरेकर यांच्या मकाच्या पिकात टाकून पिकाचे नुकसान केले. मुरूम टाकल्याबाबत विचारणा केली असता चौघांनी त्यांना घाण घाण शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी व चापटीने मारहाण केली. परत या जमिनीत आलात तर हातपाय तोडीन अशी धमकी दिली. याप्रकरणी कलम 323, 504, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS