मुंबई प्रतिनिधी - नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजिंक्य कदम असे 27

मुंबई प्रतिनिधी – नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजिंक्य कदम असे 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचे नाव असून, तो नालासोपारा पूर्व मोरे गाव आरंभ कॉलनीमध्ये राहत होता. सोमवारी सकाळी अचानक त्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अविवाहित असलेल्या अजिंक्यने 75 kg वजनात आपल्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून, पालघर जिल्ह्यात विविध पारितोषिक मिळवली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असून मुलांमध्ये घरात तो मोठा होता. अचानक त्याच्या जाण्याने कदम कुटुंबासह मित्रपरिवारवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अजिंक्य कदमला काल म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी सकाळी अचानक अस्वस्थ वाटायला लागलं होतं. छातीत दुखत असल्याचं त्याने कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र काही तासातच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित घेतलं. घरातील मोठा मुलगा अचानकपणे कायमचा निघून गेल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
COMMENTS