हिंगोली प्रतिनिधी- हिंगोली(Hingoli) शहरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संघपाल न
हिंगोली प्रतिनिधी- हिंगोली(Hingoli) शहरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाचा मैदानावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संघपाल नरवाडे(Sanghpal Narwade) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो वसमत(Wasmat) शहरातील रहिवासी होता. संघपाल गेल्या काही दिवसापासून दररोज हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर आपल्या सहकारी मित्रांसोबत पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र, मैदानावर धावत असताना संघपाल अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात( government hospital) दाखल केले मात्र डॉक्टरांनी संघपाल ला मृत घोषित केले.

COMMENTS