मुंबई प्रतिनिधी- बारावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलीने चक्क स्वतःचं रक्त विकण्याचा प्रयत्न केला. रक्तदान करण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी गेली

मुंबई प्रतिनिधी– बारावीत शिकणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलीने चक्क स्वतःचं रक्त विकण्याचा प्रयत्न केला. रक्तदान करण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी गेली होती. रक्तदान केल्यानंतर तिने पैशांची मागणी केली. यामुळे गोंधळून गेलेल्या रक्तदान केंद्रावरील इसमानं याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर या मुलीने असं का केलं, याचा धक्कादायक खुलासा झाला. त्या मुलीने 9 हजार रुपयांच्या स्मार्टफोनची ऑनलाईन खरेदी केली. पण त्याचे पैसे देण्यासाठी पश्चिम बंगालच्या बालुरघाट येथील रुग्णालयात रक्त दिले आणि नंतर त्याचे पैसे मागितले यामुळे सगळेच चक्रावून गेले.
COMMENTS