Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात १४ वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना मृत्यू

पुणे प्रतिनिधी - पुण्यातील हडपसर भागात एक दुर्दैवी घटना घडली. 14 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उन्हाळ्या

शाहीर एकनाथ सरोदे यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार
कुत्रा चावल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
बारावीचा निकाल उद्या लागणार

पुणे प्रतिनिधी – पुण्यातील हडपसर भागात एक दुर्दैवी घटना घडली. 14 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत धामणगावकर हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वेदांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. राज्य शासनाने उन्हाचा कहर वाढल्याने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नवी मुंबईतील खारघर दुर्घटनेनंतर ही सुट्टी जाहीर केली. वेदांत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता.

COMMENTS