Homeताज्या बातम्यादेश

शेतकर्‍यांचे कल्याण आमचे कर्तव्य ः पंतप्रधान मोदी

पीएम शेतकरी सन्मान निधीचा 17 वा हफ्ता जारी

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी आपल्या कामकाजाला सुरूवात केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पीएम शेतकर

पंतप्रधान मोदी आज कारगिलला भेट देणार
दोषींवर कठोर कारवाई करणार ः पंतप्रधान मोदी
अग्निपथमुळे देशाचे सामर्थ्य वाढेल

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी आपल्या कामकाजाला सुरूवात केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधीसाठी 20 हजार कोटींची मंजूरी देत शेतकर्‍यांच्या खात्यात या योजनेचा 17 वा हफ्ता जारी केला आहे. यामुळे देशभरातील 9.3 कोटी शेतकर्‍यांना फायदा होईल. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, शेतकर्‍यांचे कल्याण हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे यापुढेही कृषी क्षेत्रासाठी काम करीत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यापूर्वी पीएम शेतकरी योजनेअंतर्गत देशातील कोट्यावशी शेतकर्‍यांना फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला 16 वा हफ्ता बँक खात्यात पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाला 6 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. मात्र या योजनेअंतर्गत ही रक्कम एकरकमी न देता दोन-दोन हजार करीत वर्षातून तीनवेळा बँक खात्यात पाठवली जाते. दरम्यान, आत्तापर्यंत पीएम-किसान योजनेचे 16 हप्ते शेतकर्‍यांना मिळाले आहेत. यामध्ये पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळालेल्या 9.03 कोटी शेतकर्‍यांपैकी सर्वाधिक 2.03 कोटी उत्तर प्रदेशातील आहेत. तर महाराष्ट्र 89.66 लाख, मध्य प्रदेश 79.9.3 लाख, बिहार 75.79 लाख आणि राजस्थान 62.66 लाख होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर सोमवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. हे दोन्ही निर्णय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घेण्यात आले आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दोन कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी मिळू शकते. त्याचवेळी, आणखी एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मदतीत सुमारे 50 टक्के वाढ केली जाऊ शकते.

गरिबांसाठी 3 कोटी नवीन घरे बांधणार ः कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या पहिल्याच बैठकीत गरिबांसाठी तीन कोटी नवीन घरे बांधण्यास मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत खेडोपाडी आणि शहरांमध्ये बांधलेल्या या घरांमध्ये शौचालय, वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन असेल. गेल्या 10 वर्षांत या योजनेअंतर्गत एकूण 4.21 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. मोदी 3.0 ची पहिली कॅबिनेट बैठक सोमवार, 10 जून रोजी पंतप्रधान निवासस्थानी झाली. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते. 

COMMENTS