Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नक्षलग्रस्त भागातील युवकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आणले शिक्षणाच्या प्रवाहात

नाशिक :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने गडचिरोली गोंदिया या अतिदुर्गम  नक्षलग्रस्त भागातील तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून

प्रधानमंत्री आवास योजनेच्या मुदतवाढीवर विचार
स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी
राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्याची वंचितची मागणी

नाशिक :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने गडचिरोली गोंदिया या अतिदुर्गम  नक्षलग्रस्त भागातील तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासंदर्भात उपक्रमाला मोठ्या प्रमाणात यश आलेले दिसते. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील पोलीस प्रशासन व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आजपर्यंत जवळपास सात हजार पाचशेपेक्षा अधिक नक्षलग्रस्त भागातील युवक आणि युवतींना शिक्षणाच्या प्रवाहातआणलेले आहे. 

 गडचिरोली आणि गोंदिया सारख्या अतिदुर्गम भागात शिक्षणासाठी पूरक वातावरण नसल्याकारणाने तेथील युवकांना शिक्षणाच्यामुळ प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने गडचिरोली जिल्ह्यातील दामरंचा, गॅरापत्ती, पेंढरी, हेडरी, ताडगाव या पाच पोलीस स्टेशनमध्ये तर गोंदिया जिल्ह्यातील पिपरिया व भरनोली या पोलीस स्टेशनमध्ये दर रविवारी अभ्यासकेंद्र सुरु केलेले आहे. 

या अभ्यासकेंद्रात नक्षलग्रस्त भागातील अर्धवट शिक्षण सोडलेले तरुण  शिक्षण घेत असतात. ज्ञानगंगा घरोघरी पोहचविणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली व जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नक्षलग्रस्त भागातील तरुणांना शिक्षण देतात. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी हे या पोलीस स्टेशनमधील अभ्यासकेंद्रावर शिक्षणघेण्यासाठी येतात. 

अभ्यासकेंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम पोलीस अधिकारी व कर्मचारी करतात. मुक्त विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. सन २०१८ पासून सुरु झालेल्या या उपक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे.  जवळपास ५०० च्या वर विद्यार्थी आज अतिदुर्गम भागात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता  वार्षिक परीक्षा देत आहेत. 

समाजापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब, सिव्हिक अॅक्शन सेल चे रमेश अतकुरी, ताडगाव पोलीस स्टेशनचे श्री. प्रशांत नाकतोडे, मुरूमगावच्या पोलीस स्टेशनचे श्रीमती सुजता पडवळे आणि हेडरी पोलीस स्टेशनचे श्री. अनिल हिदमामी. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख,  नागपूर विभागीय केंद्राचे संचालक श्री. नारायण मेहरे, संपर्क अधिकारी श्री. कैलास मोरे आदी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

COMMENTS