Homeताज्या बातम्यादेश

इंडिया आघाडीकडून संख्याबळासाठी जुळवाजुळव

खा. शरद पवारांकडून नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना फोन

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचे निकाल येत असतांना कोणत्याच पक्षाला संपूर्ण बहुमत न मिळत नसल्याने इंडिया आघाडीने संख्याची जुळवा-जुळवा करण्यास सुरूव

पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरे आक्रमक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ
उमेदवारांची निवडणूक खर्चाची केली द्वितीय तपासणी

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचे निकाल येत असतांना कोणत्याच पक्षाला संपूर्ण बहुमत न मिळत नसल्याने इंडिया आघाडीने संख्याची जुळवा-जुळवा करण्यास सुरूवात केली आहे. एनडीएमध्ये असलेले तेलगु देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीशकुमार यांना आपल्या गोटात घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
खासदार शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. यासाठी शरद पवारांनी नितीशकुमार यांना फोन केल्याचे समोर आले आहे. त्या दोघांत नेमकी कोणती चर्चा झाली, ते समोर आले नसले तरी, इंडिया आघाडीकडून नितीशकुमारांना उपपंतप्रधान पदाची दावेदारी देण्यास इंडिया आघाडी तयार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेण्यासाठी आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्‍वासन इंडिया आघाडीकडून देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.  

COMMENTS