Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित’माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ प्रबोधक कथासंग्रह

ग्रामीण कथाकार डॉ. शिवाजी काळे यांचे प्रतिपादन

शिरसगाव ः प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेला ग्रामीण विनोदी, सामाजिक, विडंबनात्मक परंतु वास्तवदर्शी समाजप्रबोधक असलेला’ माकडांच्या हाती खिचड

केंद्रीय मंत्री राणेंच्या फोटोवर जोड्यांचा प्रहार…l DAINIK LOKMNTHAN
श्रीसंत गोरा कुंभार चरित्र समर्पितेचा आदर्श ः ह.भ.प.डॉ.शुभम महाराज
राहुरी फॅक्टरीत महावितरण अधिकार्‍यास मारहाण

शिरसगाव ः प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेला ग्रामीण विनोदी, सामाजिक, विडंबनात्मक परंतु वास्तवदर्शी समाजप्रबोधक असलेला’ माकडांच्या हाती खिचडी’ कथासंग्रह प्रबोधनात्मक, अंतमुर्ख करणारा असल्याचे मत ग्रामीण कथाकार डॉ. शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
 श्रीरामपूर येथील बोरावकेनगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या विविध समाजोपयी, सेवाभावी कार्यक्रमात डॉ. उपाध्ये यांच्या’ माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ कथासंग्रहाचे प्रकाशन करताना डॉ. शिवाजी काळे बोलत होते. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. कथाकार डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कथासंग्रहाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा.बाबा खरात, प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, सुदामराव औताडे पाटीलं, पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा. रामचंद्र राऊत, प्रा. शिवाजीराव बारगळ, आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका मोहिनी काळे, मंदाकिनी उपाध्ये, डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न झाले. डॉ. उपाध्ये यांनी सांगितले की, पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनतर्फ हा कथासंग्रह गुणवतापूर्ण जाणिवेने प्रकाशित केला असून विनोदी अंगाने अनेक अनुभवसिद्ध प्रसंगापर असलेला हा कथासंग्रह वाचकांना नक्कीच आवडेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. शिवाजी काळे म्हणाले, समाजातील बर्‍या, वाईट घटना प्रसंगाचेचे प्रतिबिब या कथासंग्रहात आहे. या कथासंग्रहातील16 कथा वास्तवाचा वेध घेऊन समाज प्रबोधन जाणिवेच्या या कथा आहेत.सौ. मंदाकिनी उपाध्ये यांना अर्पण केलेल्या या कथासंग्रतावर डॉ. स्नेहल तावरे यांनी मलपृष्ठावर लिहिलेला मजकूर कथासंग्रहाचे सारसर्व सांगणारे असल्याचे मत डॉ. काळे यांनी व्यक्त केले. मान्यवरांनी या कथासंग्रहाविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. उपाध्ये यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक केले. संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले यांनी नियोजन केले संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले तर मोहिनी काळे यांनी आभार मानले.

COMMENTS