कोपरगाव येथे  शिवस्वराज्य दिन साजरा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगाव येथे शिवस्वराज्य दिन साजरा

कोपरगाव येथील तहसिल कार्यालयाच्या प्रशासकीय भवन इमारतीत पंचायत समितीच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला..

स्थानिक गुन्हे शाखा हवीय…आधी गुन्हेशोध लेखी परीक्षा द्या
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी ऊस उत्पादन वाढवा : थोरात
आई ज्याला कळली तो खरा भाग्यवान ः डॉ. बाबुराव उपाध्ये

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : कोपरगाव येथील तहसिल कार्यालयाच्या प्रशासकीय भवन इमारतीत पंचायत समितीच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन हा महाराष्ट्र शासनाने स्वराज्य दिन म्हणून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येथे साजरा करण्याचे अध्यादेश दिल्या नंतर कोपरगावातही पंचायत समितीचे वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.रयतेच्या कल्याणाचे निर्णय घेवून स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणून शिवरायांना ओळखले जाते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यानंतर भगवा ध्वज असलेली गुढी उभारुन पुजन करण्यात आले.राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले.छत्रपती शिवराय यांचा जयघोष करण्यात आला.कार्यक्रमाचे ठिकाणी रांगोळी, छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेल्या कृष्णा सोनवणे हा लहान मुलगा आकर्षण ठरला. या प्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे,पंचायत समिती सभापती सौ.पौर्णिमा जगधने यांचे सह जि.प.सदस्य,पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,पशूधन अधिकारी डॉ.दिलीप दहे,जि.प.ल.प.उपअभियंता उत्तमराव पवार,सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले तहसिलदार योगेश चंद्रे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.तर आभार गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी मानले.

COMMENTS