Homeताज्या बातम्याविदेश

डोनाल्ड ट्रम्प हुश मनी प्रकरणात दोषी

11 जुलैला कोर्ट सुनावणार शिक्षा

न्यूयार्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच आगामी निवडणूकीसाठी इच्छूक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायाजयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे ट्रम्

लेखक समाजाचे दक्ष पहारेकरी असतात ः राष्ट्रपती मुर्मू
भाजपला बंडखोरीचे वारे !
राजगड पोलीस ठाण्यातील पोलीसाची गळफास लावून आत्महत्या l Lok News24

न्यूयार्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच आगामी निवडणूकीसाठी इच्छूक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायाजयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे ट्रम्प यांना हा मोठा धक्का आहे. ’हशी मनी’ प्रकरणामध्ये ट्रम्प यांच्यावर दोष सिद्ध झाले आहेत. या प्रकरणाचा निकाल देण्यापूर्वी न्यायाधीशांना सुमारे 10 तास महत्त्वपूर्ण निकालाबाबत चर्चा केली. पंरतू या हशी मनी प्रकरणात डोनाल्ट ट्र्म्प यांना काय शिक्षा होणार याची सुनावणी येत्या 11 जुलै रोजी होणार आहे.
डोनाल्ड ट्र्म्प हे गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासात असे घडले नव्हते. डोनाल्ड ट्र्म्प यांना पॉर्न स्टार्ससोबत केलेल्या व्यवहाराच्या तब्बल 34 प्रकरणात अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवले आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांनी अडल्ट फिल्म स्टार हिच्या सोबत असलेल्या पूर्वीच्या संबंधाबाबत भाष्य करु नये म्हणून तिला त्यांनी पैसे दिले होते. साधारण 2016 सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यानचे हे सर्व प्रकरण आहे. या प्रकरणाची गुरुवारी 9 तास अंतिम सुनावणी पार पडली. तब्बल 12 सदस्यी न्यासाधीशांनी दोन्ही बाजूची योग्य पद्धतीने जाणून घेत डोनाल्ड ट्र्म्प यांनी दोषी ठरवले. मात्र आता त्यांना या प्रकरणी कोणती शिक्षा सुनावली जाते हे 11 जुलै रोजी स्पष्ट होईल. अडल्ट फिल्म स्टार हिने डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासोबत आपले पूर्वी संबंध असल्याचा दावा केला होता. तिने त्या संबंधिचे अनेक गोष्टी अमेरिकेतील काही प्रकाशंकाकडे सर्वांपर्यंत समजण्यासाठी पाठवल्या होत्या. मात्र या गोष्टी अमेरिकेते चर्चेला कारण ठरु नये असे ट्र्म्प यांना वाटत होते. म्हणून ट्र्म्प यांनी तिला 1 लाख 30 हजार डॉलर्स दिले होते. त्यानंतर काही वर्षांनी 2018 एका जर्नलने ट्र्म्प आणि तिच्यामध्ये झालेला व्यवहार उघड केला होता. 2018 च्या प्रकरणानंतर ट्र्म्प यांच्यावर फौजदारी खटला चालविण्यात आला. यात कोर्टाने 6 आठवड्यांच्या कालावधीत 22 साक्षिदारांची सुनवाणी घेतली होती त्यानंतर डोनाल्ड ट्र्म्प यांनी दोषी ठरवले.

COMMENTS