Homeताज्या बातम्यादेश

लोकशाहीच्या उत्सवाची आज सांगता

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज शनिवारी 57 मतदारसंघासाठी मतदान होत आहे. एप्रिल महिन्याच्या 19 तारखेपासून सुरू झालेल्या य

 विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतला लेझीम खेळण्याचा आनंद
अनुसूचित जातीच्या 50 हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ
संघर्षातून मिळालेला मताधिकार बजवा!

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज शनिवारी 57 मतदारसंघासाठी मतदान होत आहे. एप्रिल महिन्याच्या 19 तारखेपासून सुरू झालेल्या या मतदान महाभियानाची शनिवारी सांगता होणार आहे.  हा अखेरचा टप्पा असून, पुढील काही तासांमध्येच अर्थात 4 जूनरोजी निकाल जाहीर होणार आहे. या अखेरच्या टप्प्यात बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालसह 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. याच्या सोबतीला, ओदिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 विधानसभा मतदारसंघांसाठीही याच वेळी मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात एकूण 904 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांपैकी 328 पंजाबमधील, 144 उत्तर प्रदेश, 134 बिहार, 66 ओडिशा, 52 झारखंड, 37 हिमाचल प्रदेश आणि चार चंदीगडमधील आहेत. या महाभियानात या आधी 6 टप्प्यात 486 लोकसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले आहे. 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 486 लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले आहे.  मतदान यंत्रे आणि मतदान साहित्यासह मतदान अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. मतदान सुखकर आणि सुरक्षित वातावरणात होईल याची खात्री करण्यासाठी पुरेशी सावली, पिण्याचे पाणी, रॅम्प आणि स्वच्छतागृहांसह सर्व मूलभूत सुविधांसह मतदारांचे स्वागत करण्यासाठी मतदान केंद्रे सज्ज आहेत.  हवामान विभागाने ज्या भागांसाठी उष्ण हवामान किंवा पावसाचा अंदाज वर्तवला असेल अशा भागात, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य यंत्रणांनी प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उष्ण वातावरण असूनही, मतदारांनी मागील टप्प्यात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. मागच्या दोन टप्प्यात, महिला मतदानाची टक्केवारी पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले आहे. मतदारांनी घराबाहेर पडून जबाबदारी समजून घेत, अभिमानाने तसेच अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

हाय होल्टेज लढती – वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी विरुद्ध अजय राय
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये काँग्रेस नेते अजय राय यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. पीएम मोदी 2014 आणि 2019 मध्ये वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आणि आता त्यांच्या तिसर्‍या कार्यकाळाकडे लक्ष लागले आहे. अजय राय पूर्वी भाजपचे नेते होते, परंतु 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कंगना रणौत विरुद्ध विक्रमादित्य सिंह – 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपने अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांच्याविरोधात राणौत निवडणूक लढवणार आहेत. मंडी हा वीरभद्र कुटुंबासाठी बालेकिल्ला आहे.

गोरखपूरमध्ये रवी किशन विरुद्ध काजल निषाद – अभिनेते आणि राजकारणी रवी किशन हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत आणि ते समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.

COMMENTS