Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नॅशनल पिनॅकल अवार्डने संतोष यादव यांचा गौरव

गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. रमेश तवडकर यांच्या हस्ते वितरण

अहमदनगर: कल्याण ठाणे  येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा प्रशासकीय सेवा सहयोगसाठीचा नॅशनल पिनॅकल अवॉर्ड 2024 हा पुरस्कार गोवा वि

नगर जिल्यातील वयोवृद्धांना मिळणार मोफत साहित्य
केडगांव मध्ये रेमिडीसीवीर इंजेकशनसाठी नागरिकांचा रास्ता रोको | ‘आपलं नगर’ | LokNews24
पदोन्नती आरक्षण रद्दच्या त्या आदेशाला खंडपीठात आव्हान ; पारनेरच्या आंबेडकरांची जनहित याचिका

अहमदनगर: कल्याण ठाणे  येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा प्रशासकीय सेवा सहयोगसाठीचा नॅशनल पिनॅकल अवॉर्ड 2024 हा पुरस्कार गोवा विधानसभेचे सभापती डॉ. रमेश तवडकर, बुंदेलखंड येथील जलयोध्दा पद्मश्री उमाशंकर पांडे, पत्रकार संपादक सचिन कोरडे यांच्या हस्ते तर पणजी पणजी (गोवा) येथे अभिनेत्री आशु सुरपूर, संस्थेचे संचालक प्रवीण साळवे यांच्या उपस्थितीत स्वीकारला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रियांका देवरे यांच्या कथकनृत्याने झाली. तद्नंतर दिगंबर पवार यांनी  लावणी, तर जादुचे प्रयोग जादू शिरोळे व प्रकाश शिरोळे हे सादर केले. संतोष यादव हे केडगाव टपाल कार्यालयात पोस्टमास्तर म्हणून कार्यरत आहेत.टपाल विभागाच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील असतात. यासह मागील 32 वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहेत. विभागीय सचिवपदी, तर महाराष्ट्र व गोवा राज्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या  महाराष्ट्र सर्कलच्या कार्याध्यक्षपदी कार्यरत आहेत. या माध्यमातून विभागातील कर्मचार्‍यांच्या प्रलंबित व न्याय प्रश्‍न प्रशासनासमोर ठेवत ते सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.याबरोबरच सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरू प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह असे आहे. संतोष यादव यांचेसह राज्यभरातील चाळीस पेक्षा अधिक जणांना पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. रमेश तवडकर, जलयोद्धा पद्मश्री उमाशंकर पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व पुरस्कारार्थी यांना शुभेच्छा दिल्या. संतोष यादव यांना पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांचा  राज्यभरातील मित्रपरिवाराकडून शुभेच्छा संदेश पाठवत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील पुरस्कारप्राप्ती यांचे स्नेही मित्रपरिवार,संस्थेचे पदाधिकारी  उपस्थित होते. संस्थेच्या वतीने प्रथमच राज्याबाहेर गोवा येथे दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा घेतल्याने अनेकांनी संस्थेचे संचालक प्रवीण साळवे यांचेसह यांच्या सर्व सहकारी यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन रुचिका भोंडवे यांनी, तर आभार साळवे यांनी मानले.

COMMENTS